ताज्याघडामोडी

पंतप्रधान आवास योजनेवरची स्थगिती उठवा अन्यथा लाभधारकांना सोबत घेऊन महर्षी वाल्मिकी संघ करणार मोठे जनआंदोलन! -गणेश अंकुशराव लाभार्थ्यांसह आवास योजनेच्या इमारतीवरुन मारणार उड्या

पंतप्रधान आवास योजनेवरची स्थगिती उठवा अन्यथा लाभधारकांना सोबत घेऊन महर्षी वाल्मिकी संघ करणार मोठे जनआंदोलन! -गणेश अंकुशराव
लाभार्थ्यांसह आवास योजनेच्या इमारतीवरुन मारणार उड्या!!

पंढरपूर (प्रतिनिधी):- भुवैकुंठ पंढरी नगहरीत गेल्या कित्येक वर्षांपासुन पंढरी नगरीत वास्तव्यास असलेलल्या परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अद्यापही स्वत:च्या घराचं स्व्प्नं साकारु न शकलेल्या हजारो बेघरांना स्वत:च्या हक्काचं घर मिळावं या उद्दात्त हेतुन पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना पंढरीत साकारत आहे. या भव्य प्रकल्पाची उभारणी झालेली असताना आणि आता याचं लोकार्पण करण्याची वेळ आलेली असतानाच कांही उपाशी पोटी आत्मे सजामसेवेच्या आड कमिशन खाण्यास लालचावलेले कांही महाभाग काहिनाकाही कारणाने या कामात दोष दाखवून सदर जनसमान्यांच्या हिताच्या प्रकल्पास खोडा घालण्याचे काम करत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासुन आपल्या हक्काच्या घरात जाण्याचं सर्वसामान्य लाभार्थ्यांचं स्व्प्नं पुर्ण होण्याच्या आतच कांहीजणांनी या चांगल्या प्रकल्पाला स्थगिती आणली. यामुळे गरिबाच्या हक्काचं घर मिळण्याच्या स्वप्नाचा चुराडा झाला. हा अन्याय महर्षी वाल्मिकी संघ कदापीही सहन करणार नाही. ही स्थगीती त्वरीत उठवली गेली नाही तर आम्ही महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते व सदर योजनेतील सर्व लाभधारकांसह प्रधानमंत्री आवास योजनेच्या इमारतीवरुन उड्या घेऊन आत्मसर्पण करु! असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
एक तर गेल्या कित्येक काळापासुन पंढरीत सर्वसामान्य, गोरगरीबांसाठी एकही मोठी योजना आलेली नाही. असे असताना झोपडपट्टीधारक, बेघर, भाड्याच्या घरात पिढ्यानपिढ्या आपल्या संसाराचा गाडा कसाबसा हाकलणार्‍या हजारो गोरगरीबांना आपल्या स्वप्नातील मजबुत आणि सर्वसोयींनियुक्त असं घर मिळावं या उदात्त हेतुन पंढरपूर नगरपरिषदेने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातुन प्रशस्त जागेत कोट्यावधी रुपयांची ही योजना उभारली आहे. सदर योजनेत घर मिळावे म्हणून जवळपास 800 ते 900 च्या आसपास लाभार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तताही केली आहे. सदर घरांची सोडत निघायच्या आधीच कांही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विघ्नसंतोषी मंडळींनी विविध कारणे दाखवत या प्रकल्पाच्या कामास व सोडतीस वरिष्ठ राजकिय नेत्यांना चुकीची माहिती देऊन स्थगिती आणली आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षापासुन स्वत:च्या घराची स्वप्नं बघणार्‍या गरगरीब मायमाऊलींनी डोळ्याला पदर लावला आहे.

एकीकडे पंढरीत मोक्याच्या जागा कांही धनधांडग्यांकडून कवडीमोल किंमतीने लाटल्या जाताहेत, एकीकडे अनेक ओपन स्पेस ओस पडलेले आहेत, एकीकडे झोपडपट्ट्यांमधील जागा देखील कांही धनदांड्यांनी लाटलेल्या आहेत. असे असताना गोरगरीबांच्या हक्काच्या सावलीखाली म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेत सुध्दा स्वत:ला कांही मिळतंय का? याचा चाखाचोळा घेणारे लोकच इथं लुडबुड करत आहेत. हे पंढरपूरकरांनाही माहिती आहे.
जर लवकरात लवकर प्रधानमंत्री आवास योजनेवरील स्थगिती उठवली नाही तर मग विरोध करणार्‍यांची लायकी काय आहे? हे दाखवण्यासोबतच सर्वसामान्यांचा तळतळटाट किती वाईट असतो! हे दाखविण्यासाठी आम्ही वरील आंदोलन लाभार्थ्यांसोबत करणार आहोत. अशी माहिती गणेश अंकुशराव यांनी दिली आहे. यावेळी समाजसेवक श्रीनिवास उपळकर, सागर चव्हाण, विशाल वाघमारे आदी उपस्थित होते. 
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago