पंढरपूर, दि. 27 :-महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा व विधानपरिषदेतील विद्यमान सदस्य अथवा माजी सदस्यांचे दु:खद निधन झाल्यास त्या निधनाबद्दल संबधित सभागृहात शोक प्रस्ताव संमत करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येते. त्याअनुषंगाने विधानमंडळाने तयार केलेले स्मृतीपत्र दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांना स्मृतीपत्र व विधानसभा सभागृहात झालेल्या शोकप्रस्तावाच्या कार्यवाहीची प्रत आमदार प्रशांत परिचारक व प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते श्रीमती जयश्री भालके यांना देण्यात आले. यावेळी तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, पोलीस निरिक्षक किरण अवचर, नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे, सरपंच शिवाजी भोसले, भालके कुटुबीयांतील सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य नागरिक उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…