पंढरपूर- ‘कुसुमाग्रजांच्या मराठीतील साहित्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर भारताबाहेर देखील मराठी भाषेला विशेष महत्व प्राप्त झाले असून कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यातील अदभूत लेखनातून ‘मराठी भाषा’ ही जागतिक स्तरावर पोहचवली आहे. आज आपल्याला मातृभाषेमुळेच भाषेची गोडी निर्माण होवून मनातील असणाऱ्या भावना अधिक उत्कटपणे प्रकट करता येतात. म्हणून मराठी भाषा ही आता अधिक समृद्ध झाली पाहिजे.’ असे प्रतिपादन स्वेरी डिप्लोमाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष डॉ.विजय कुलकर्णी यांनी केले.
मराठी साहित्य क्षेत्रात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक, प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांच्या १०९ व्या जयंती निमित्त स्वेरीत ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी स्वेरी डिप्लोमाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष डॉ.विजय कुलकर्णी हे कुसुमाग्रजांच्या साहित्यावर व जीवनावर प्रकाश टाकत होते. प्रारंभी शिवसेना नेते व पेनुरचे ग्रामपंचायत सदस्य चरणराज चवरे व भाजपा सरचिटणीस रमेश माने यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी देखील मराठी भाषेचे महत्व पटवून सांगताना कुसुमाग्रजांच्या साहित्यातील ‘अनमोल ठेवा’ सांगितला. यावेळी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी स्वरचित मराठी साहित्य, कविता व लेख वर्ग शिक्षकांना ऑनलाईन पाठवले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, ए.आर.यार्दी, सुभाष कुलकर्णी तसेच पेनुरचे नूतन सरपंच सुजित आवारे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण चवरे, सदस्य संजय रणदिवे, सदस्य ग्यानबा चवरे, पत्रकार सुहास आवारे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. भुवनेश्वरी मेलिनामठ, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. करण पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रशासन अधिष्ठाता डॉ. सचिन गवळी यांनी आभार मानले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…