पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंडाबाई भारत ढवळे यांची बिनविरोध निवड कऱण्यात आली तर उपसरपंच पदासाठी पूजा अमरसिह खांडेकर व राजाबाई पांडुरंग गडदे यांचे अर्ज आल्याने झालेल्या मतदान प्रक्रियेत पूजा अमरसिह खांडेकर यांनी ९ पैकी ६ मते मिळवून विजय संपादन केला. १५ जानेवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या भटुंबरे ग्रामपंचातीच्या निवडणुकीत लोकसेवा ग्रामविकास आघाडीने ९ पैकी ६ जागांवर विजय प्राप्त केला होता.यानंतर झालेल्या आरक्षण सोडतीत सरपंच पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी निघाले होते.या निवडीनंतर नूतन सरपंच,नूतन उपसरपंच व लोकसेवा ग्रामविकास आघाडीच्या ग्रा.प.सदस्यांचा ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भटुंबरे ग्राम पंचायत कार्यालयात झालेल्या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री ननवरे व ग्रामसेविका सौ. गायकवाड यांनी काम पाहिले.यावेळी फांचीराम शिंदे,भारत शेंबडे,लक्ष्मण खांडेकर,भीमराव शिंदे,दत्तात्रय येडगे,अंकुश शेंबडे,पंडित शेंबडे,शिवाजी तावसकर,सुरेश शिंदे,राजाभाऊ जाधव,तात्या सलगर,भय्या कांबळे,संतोष शिंदे,नवनाथ वाघमारे,भीमा गायकवाड,विकास डांगे,पोपट शिंदे,शिवाजी सलगर,अजय खांडेकर,भाऊसो ढवळे,अक्षय डांगे,नाना पवार,आबा जाधव,नवनाथ खांडेकर,मोहन खांडेकर,बाबा येडगे,अर्जुन लोखण्डे,संजय शिंदे,अंकुश शिंदे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…