सुशिलकुमार शिंदे साहेबांमुळे पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांना मिळाला निधी – नितीन नागणे
युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या पाठपुराव्यास यश
पंढरपूर –
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील पुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी व ते चांगल्या प्रकारे करण्यात यावेत यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे बांधकाममंत्री ना.अशोकराव चव्हाण साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. त्यास यश आले असून शिंदे साहेबांमुळे पंढरपूर तालुक्यातील अनेक रस्त्यांना निधी मिळालेला असून अनेक महत्वाचे मार्ग दुरूस्त होणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिलेली आहे.
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था पुरामुळे खराब झालेली आहे. यामुळे नागरिकांची व विद्यार्थ्यांची फार मोठी गैरसोय होत आहे व वारंवार ग्रामस्थांकडून मागणी होत असल्यामुळे याबाबत सुशिलकुमार शिंदेसाहेब यांच्याकडे सदरच्या मागणीचे निवेदन देवून अनेक दिवसांपासून रस्त्याची कामे प्रलंबित असल्याचे सांगितले. यानंतर शिंदे साहेबांनी आपल्या लेटरहेडवर राज्याचे बांधकाममंत्री चव्हाण साहेब यांच्याकडे पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती करावी व सदरच्या कामात आपण लक्ष घालून संबंधित कामास तात्काळ मंजूरी देण्यात यावी असे पत्र दि.21/1/2021 रोजी पाठवून दिले.
यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी निधीस मंजूरी उपलब्ध होवून त्याचे काम सुरू होणार असल्यामुळे अनेकांतून आभार मानण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी दिली.
चौकट
शिंदे साहेबांचे पंढरपूर – मंगळवेढ्यावर विशेष प्रेम
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब हे पहिल्यापासूनच आपल्या पंढरपूर – मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील कामांकडे अतिशय प्रेमाने लक्ष देत असून नागरिक व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतात. पंढरपूर – मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील अनेक रस्ते पुरामुळे खराब झालेले आहेत यामुळे शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे असे सांगत असतानाच शिंदे साहेबांनी अशोकराव चव्हाण यांना फोन लावून माझ्या मतदारसंघातील खराब झालेल्या रस्त्यांना दुरूस्त करण्यासाठी लवकरात लवकर मंजूरी देण्यात यावी व कामे तात्काळ सुरू करावीत असे सांगितल्यामुळे साहेबांचे दोन्ही तालुक्यांवर विशेष प्रेम असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.