पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांनी यावर्षी अभिनव पद्धतीने ग्रामपंचायत निवडणूक लढविल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील श्री. अभिजीत पाटील यांनी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींसाठी १लाख रू.बक्षीस घोषित केले होते. तसेच नवनिर्वाचित व ग्रामपंचायत सदस्यांसाठी आदर्श पुरस्कार सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे मार्गदर्शन शिबीर ही आयोजित करण्यात आले होते.
देगाव हे तर श्री. अभिजीत पाटील यांचे मूळ गाव. या गावातही त्यांच्या पुढाकाराने ८ सदस्य बिनविरोध निवडून आले व त्यातील दोघांना सरपंच – उपसरपंच पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सरपंचपदी सौ. सीमा संजय घाडगे तर उपसरपंचपदी श्री. धर्मेंद्र कोंडीबा घाडगे यांची नेमणूक करण्यात आली असून, परस्पर सहमतीने इतर सदस्यांना पुढील कार्यकाळाची ही जबाबदारी देण्यात येणार आहे. गावातील नागरिकांना प्रोत्साहन दिल्यास आदर्श गावाकडे वाटचाल होऊ शकते याचे उदाहरण यामुळे प्रस्थापित झाले आहे.
अभिजीत पाटील गटातील प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांना काम करण्याची संधी मिळणार असून गावांचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतो, या भूमिकेतून गावाच्या विकासासाठी त्यांचा कायम पुढाकार असतो असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…