पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने शहरातील गोपाळपूर रस्त्यावरील नगर पालिकेच्या मालकीच्या सर्व्हे नं.१७ ब मध्ये शहरातील बेघर व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना परवडणाऱ्या किमतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंर्तगत घरे देण्याच्या हेतूने उभारणी करण्यात येत असलेल्या प्रकल्पास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलेली स्थगिती उठवावी अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव,नगर परिषद संचनालय आयुक्त व जिल्हाधिकारी सोलापूर आदींना देण्यात आले असून २५ फेब्रुवारी पर्यंत सदर प्रकल्पावरील स्थागिती न उठविल्यास शुक्रवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी आ.प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात नगराध्यक्षा साधना भोसले यांच्यासह शहर भाजपचे सर्व पदाधीकारी,पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी व भाजपचे सर्व नगरसेवक संभाव्य घरकुल लाभार्थी यात सहभागी होणार आहेत.
पंढरपूर शहरात प्रधानमंत्री घरकुल योजनेची प्रभावी अमलबजावणी करणेसाठी व संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करून त्या अहवालानुसार शहरातील सर्व्हे क्रमांक १७ ब येथे भागीदारी तत्वावर परवडणारी घरे या योजनेअंतर्गत प्रकल्प अहवाल तयार करून राज्यशासनाकडून आवश्यक त्या मंजुऱ्या प्राप्त करून या २०९२ घराच्या प्रकल्पाची महारेरा नोंदणी करण्यात आली.या योजनेचे काम प्रगतीपथावर असून पहिल्या टप्प्यातील ८९२ घरकुलांचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे.लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्याकरता पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात येत असताना व लॉटरी पद्धतीने घरकुलांचे वाटप करण्यासाठी २६ जानेवारी रोजी सोडतही काढण्यात येणार होती मात्र शहरातील काही संघटनांनी राजकीय हेतूने खोट्या तक्रारी करून या प्रकल्पास स्थगिती मिळविली आहे.हि स्थगिती तातडीने उठवण्यात यावी अशा आशयाचे फॅक्सद्वारे निवेदने पाठवण्यात आली असून २५ फेब्रुवारी पर्यंत राजकीय हेतूने दिलेली हि स्थगिती न उठविल्यास आ.प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन केले जाईल अशी माहिती भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम शिरसट यांनी दिली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…