ताज्याघडामोडी

स्वेरी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या अध्यापन सुविधा पुरवते                                                                         – शास्त्रज्ञ डॉ.विजय  निंबाळकर शास्त्रज्ञ डॉ.विजय निंबाळकर यांची स्वेरीला सदिच्छा भेट

पंढरपूर –‘स्वेरी हे एक असे एक महाविद्यालय आहे की, जे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील अध्यापन सुविधा प्रदान करते. स्वेरी विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे काटेकोरपणे लक्ष देते. ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने अतिशय मोलाची बाब आहे. मी बर्‍याच देशांमध्ये आणि तेथील शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या आहेत पण स्वेरी सारख्या शिक्षण संस्था अतिशय दुर्मिळ आहेत. स्वेरीचे शैक्षणिक साम्राज्य, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी विकासासाठी केले जाणारे परिश्रम पाहून मी खूप प्रभावित झालो आहे, मला भविष्यात पुन्हा या कॉलेजला भेट द्यायची आहे. स्वेरीच्या शैक्षणिक धोरणाचे आणि विशेष करून प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सरांचे विशेष कौतुक वाटते.’ असे प्रतिपादन नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (एनएमआरएल), संरक्षण मंत्रालय-डीआरडीओ मुंबई चे शास्त्रज्ञ डॉ.विजय निंबाळकर यांनी केले.
      गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला शास्त्रज्ञ डॉ.विजय निंबाळकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी स्वेरीतील शैक्षणिक सुविधा पाहून  गौरवोद्गार काढले. प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. करण पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी स्वेरीची स्थापनेपासून ते आत्तापर्यंतची जडण घडण, कार्यपद्धती, मिळालेली मानांकने, संशोधनातील गरुड भरारी, तंत्रज्ञानातील महत्वाच्या संकल्पना, विद्यार्थ्यांना भविष्यातील असलेल्या विविध संधी याची माहिती जाणून घेतली तसेच प्राध्यापकांशीही त्यांनी संवाद साधला. प्राध्यापकांनी चौकसपणे विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी योग्य आणि समर्पक उत्तरे दिली. यावेळी त्यांनी स्वेरी कॅम्पस मधील विविध विभागाबरोबरच ग्रामीण मानव संसाधन विकास केंद्रास (आरएचआरडीएफ) भेट दिली व तेथे सुरु असलेल्या संशोधनाचा आढावा घेतला. तसेच वर्कशॉप, अभियांत्रिकी व फार्मसीमधील विविध विभाग यांची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी ही उपस्थित होत्या. तसेच स्वेरीतील अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

20 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago