ताज्याघडामोडी

…तर तो शक्ती कायदा काय चाटायचा काय ?

मुळची बीडमधील परळी वैजनाथची असलेल्या पूजाने 8 फेब्रुवारीला पुण्यातील महंंमदवाडीतील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती.या प्रकरणात करूणा धनंजय मुंडे यांनी उडी घेतली आहे. यासंदर्भात करूणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.दिशा बरोबर झालं आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही, आम्ही न्याय मागतो भीक नाही. पूजा चव्हाण यांची आत्महत्या की हत्या याची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. पूजा चव्हाण यांना न्याय भेटलाच पाहिजे, अशी मागणी करूणा मुंडे यांनी केली आहे.

करुणा शर्मा यांनी जीवन जो सामाजिक संस्थेचे काही बॅनर फेसबुकवर शेअर केले आहेत. या संस्थेचं आपण महाराष्ट्र महिला अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. करुणा शर्मा या महिलेने फेसबुकवर करुणा धनंजय मुंडे नावाचं अकाउंट आहे. या अकाउंटवर त्यांनी धनंजय मुंडेंसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. मुळची बीडमधील परळी वैजनाथची असलेल्या पूजाने 8 फेब्रुवारीला पुण्यातील महंंमदवाडीतील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती.या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या. यामध्ये कथित मंत्री आणि अरूण राठोड नावाच्या तरूण संवाद साधत आहे. मात्र संजय राठोड यांनी यावर अद्यापही आपली प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे ते संशयाच्या भोवऱ्याच सापडले आहेत. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

3 days ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 weeks ago

स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मशाल : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विनम्र अभिवादन

पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…

3 weeks ago

राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…

3 weeks ago

पंढरपूर पंचायत समितीचा नूतन सभापती कोण ? ईश्वर चिट्ठी कि पालकमंत्री गोरे करणार फैसला ?

वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…

3 weeks ago

विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक संघाचे उल्लेखनीय यश

इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी…

3 weeks ago