भरसभेत इंटरनॅशनल डॉनबद्दल भाजप आमदार गणेश नाईक यांनी वक्तव्य केले होते. मला सर्व इंटरनॅशनल डॉन ओळखतात, गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. एसआटीमार्फत इंटरनॅशनल डॉनबरोबर संबंध असल्याचे जाहीर वक्तव्य करणारे भाजप आमदार गणेश नाईक यांची चौकशी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
तुर्भे येथील भाजपच्या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी गणेश नाईक बोलत होते. जसजशी नवी मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत आहे तसतसे फोडाफोडीचे राजकारण नवी मुंबईत रंगले आहे. भाजपचे काही नगरसेवक निवडणुकीच्या आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने फोडले आहेत. गणेश नाईक यांनी या फोडाफोडीवर भाष्य करताना शिवसेनेवर हल्लाबोल केला. कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. येथीलच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात. त्यामुळे घाबरायची गरज नसल्याचे असं गणेश नाईक यांनी जाहीर भाषणात म्हटले होते.
सुप्रिया सुळे यावरुन बोलताना म्हणाल्या की, एसआटीमार्फत इंटरनॅशनल डॉनसोबत संबंध अससल्याचे जाहीर वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईक यांची चौकशी करावी. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असून याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घालावे. यासाठी अमित शाह यांच्यासोबत लेखी पत्रव्यवहार करणार असून संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान महाराष्ट्र सहकारी बॅंक घोटाळ्यातून अजित पवार यांना क्लिन चीट मिळाल्याने भाजप परत एकदा तोंडावर पडल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. तर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलीस योग्य तो तपास करतील, महाराष्ट्र पोलिसांवर आपला विश्वास असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…