ताज्याघडामोडी

कमी कालावधीत सहकार क्षेत्रात चांगला ठसा उमटवणारे अभिजीत पाटील:- शेखर गायकवाड* चार लाख 91 हजार 111साखर पोत्यांचे पूजन

 

धाराशिव साखर कारखाना, युनिट क्र.३ येथे राज्याचे साखर आयुक्त शेखरजी गायकवाड व त्यांच्या पत्नी या उभयतांच्या हस्ते ४ लाख ९१ हजार १११ साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.

यावेळी संपूर्ण कारखान्याची त्यांनी पाहणी केली. साखर कारखानदारी अतिशय उत्तमरीत्या, सक्षमपणे आपण चालवीत असल्याबाबत कौतुक केले. हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवित असून अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि कुठेही गळती नसलेला असा कारखाना आपण प्रथमच पाहतो आहोत असेही ते म्हणाले.

आपल्या कारखानाची साखर पांढरी शुभ्र, दाणेदार आणि उत्पादनही अत्यंत उत्कृष्ट, असून या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना या कारखान्यातून न्याय मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न या बंद कारखान्यामुळे ऐरणीवर होता. मात्र कारखाना चालू करून हा प्रश्न आपण मार्गी लावला त्याबद्दल कारखान्याचे संचालक व चेअरमन अभिजीत पाटील यांचे अभिनंदन साखर आयुक्तांनी केले.

याप्रसंगी श्री.वांगे साहेब, श्री. वाडीकर साहेब, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. अमर पाटील, संचालक श्री. भागवत चौगुले, श्री. संजय खरात, श्री. दिपक आदमिले, प्रगतशील बागायतदार श्री. केरू सावकार, श्री. बाबा जामगे, ओंकार पाटील, गणेश रणदिवे, अक्षय रणदिवे,तसेच जनरल मॅनेजर ढाके, चिफ इंजिनिअर पवार, चिफ केमिस्ट पेठे सर्वअधिकारी, कर्मचारी वर्ग व परिसरातील ग्रामपंचायत सदस्य मान्यवर, शेतकरी सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago