पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार‘ श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर चे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांना नुकताच जाहीर झाला. त्याबद्दल विद्यार्थी पालक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आबासाहेब दैठणकर यांनी डॉ. बी.पी. रोंगे यांचा सत्कार केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तर्फे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार‘ नुकताच घोषित करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थी पालक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आबासाहेब दैठणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्वेरीमध्ये येवून डॉ. बी.पी.रोंगे सरांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष आबासाहेब दैठणकर डॉ. रोंगे सरांबद्दल मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सर हे केवळ सर्वोत्कृष्ट प्राचार्यच नव्हे तर त्यांनी स्वेरी परिवार, स्वेरीज् कॉलेजेस ही शैक्षणिक दृष्टीने सर्वश्रेष्ठ केली आहेत. आपला विद्यार्थी शिक्षण व करिअर मध्ये सर्वोत्कृष्ट करण्याचा पायंडा त्यांनी घातला आहे. तोच पायंडा आता स्वेरीतील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी पाळत आहेत. डॉ.रोंगे सरांनी स्वेरीचा सर्व स्टाफ सुद्धा सर्वोकृष्ट ठेवला आहे. स्वेरी हे प्राचार्यांच्या नावे संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखले जाणारे बहुधा एकमेव शिक्षण संकुल आहे. प्राचार्य डॉ. रोंगे सर यांच्याच नावावर चालणारे कॉलेज म्हणून स्वेरीकडे पहिले जाते. शिक्षण क्षेत्रातील विशेष पैलू मुळे तंत्र शिक्षणाबाबतीत या संस्थेची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात कोठेही गेले तरी पंढरपुरातील स्वेरी महाविद्यालयाला ‘डॉ. रोंगे सरांचे कॉलेज’ म्हणून ओळखले जाते. मग ते विद्यार्थ्यांच्या बाबतीत असो, वा कर्मचार्यांच्या बाबतीत असो.‘स्वेरी मध्ये नुसते विद्यार्थीच घडत नाहीत तर शिक्षकही घडून अष्टपैलू होतात. त्यामुळे त्यांनाही इतर महाविद्यालयात बोलावले जाते.‘ या सत्कारा बद्दल आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. बी. पी.रोंगे म्हणाले की, ‘सुरुवाती पासून स्वेरीची यशाची परंपरा कायम राहिली आहे. नुकतेच स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांना केंद्र सरकारचा ‘विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर्स अवॉर्ड‘ प्रथम क्रमांकाने मिळालेला आहे. स्वेरीची ही परंपरा अशीच पुढे चालू राहिली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी सतत चांगले कार्य करत राहिले पाहिजे.‘ या सत्कार समारंभ प्रसंगी स्वेरीतील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…