बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या एकास हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल व चार काडतूसे हस्तगत करण्यात आली. अजय दिलीप लागळे(26,रा.गोंधळेनगर, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हडपसर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना पोलीस शिपाई नितीन मुंढे यांना गोंधळेनगरच्या पुलावर एक व्यक्ती बुलेटवर बसला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून आरोपी लाळगेला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता पिस्तूल व काडतूसे हस्तगत करण्यात आली. त्याच्यावर आर्म ऍक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई करत असतानाच तडीपार आरोपी विनित रविंद्र इंगळे(21,रा.हडपसर) हाही पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्यालाही ताब्यात घेऊन तडीपारीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजु अडागळे व दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने यांच्या पथकाने केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…