ताज्याघडामोडी

नवनीत राणा यांना अ‌ॅसिड अटॅक आणि जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना जीवेमारण्याची धमकी आली आहे. लोकसभेमध्ये शिवसेनेविरोधात बोलल्यामुळे ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेच्या लेटरहेडवरून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केला असल्याचेही बोलले जात आहे. या प्रकणी नॉर्थ एव्हेन्यू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एफआयआरची प्रत ही 13 फेब्रुवारी 2021 ची आहे.

नवनीत राणा यांनी तक्रारीत काय म्हटले आहे?

नवीनत राणे यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे. त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, 8 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील माझ्या भाषणाविरोधात शिवसेनेचे लेटरहेड असलेले निनावी पत्र आले आहे. या पत्रामधून अपमान आणि शिवीगाळ करण्यात आली आहे. यासोबतच आठ दिवसांमध्ये मला आणि माझ्या पतीला जीवे मारण्याची आणि अ‌ॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली असल्याचे नवनीत कौर राणा यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या आहेत की, शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळांनी हे पाठवले आहे. लोकशाहीसाठी असे शब्द अजिबात चांगले नाहीत. आपल्यासंबंधी अश्लील शब्दांचा वापर करून धमकी देणारे फोनही करण्यात येत आहेत. कोणत्याही सामान्य स्त्रीविरूद्ध हा गंभीर गुन्हा आहे असल्याचे नवीनत राणा यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

18 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago