राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरूणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला इशारा दिला आहे.मला न्याय मिळाला नाही तर मी पाच दिवसाच्या आत आत्महत्या करणार. इतकंच नाही तर माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील, असं पीडित तरूणीने म्हटलं आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आणि पीडित तरुणीने पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
औरंगाबाद शहरातील बायजीपुरा राहणाऱ्या खाजगी शिकवणी घेणार्या 29 वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर करण्यात आला होता. मात्र मेहबूब शेख यांनी बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. मात्र आता पीडित तरूणीने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला इशारा दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना शेख यांनी आपण निर्दोष असून माझी नार्को टेस्ट करण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळी मेहबूब शेख यांना पत्रकार परिषदेत रडू आलं होतं.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…