दैनिक नवभारत वृत्तपत्र समुहाच्या दैनिक नवराष्ट्रच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा “आदर्श उद्योजक” हा पुरस्कार यंदा डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना प्रदान करण्यात आला आहे.
उद्योग सांभाळून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न त्यांनी सोडविला आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमधून सामाजिक भान जपत युवकांना सकारात्मक कार्यासाठी संघटित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.उद्योग क्षेत्रात त्यांनी मिळवलेल्या कौतुकास्पद आणि दैदिप्यमान यशाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
पुणे शहरातील एम.एम.जोशी सभागृह येथे हा समारंभ घेण्यात आला. राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देण्यात आला असून त्याप्रसंगी पुण्याचे महापौर .मुरलीधर मोहोळ, खा.गिरीश बापट, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले, श्रीनिवास रावू, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, नवराष्ट्र पत्रकार राजेशजी शिंदे आदींची उपस्थिती होती.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…