पंढरपूर :प्रतिनिधी
पंढरपूर नगरपरिषदेने नुकतीच जाहीर केलेली जा.क्र./पंनपं/नअ/ ४३२/२०२१ दि ०९/०२/२०२१ ही निविदा ही निविदा म्हणजे बसलेले व्यवसाय मोडीत काढून खर्च करणाऱ्यावर अन्याय करणारी निविदा आहे. तरी ती निविदा रद्द करावी अन्यथा येत्या बुधवार दि17 फेब्रुवारीधरणे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा खोकिधरक यांनी दिला आहे.
या काढण्यात आलेल्या निविदामध्ये पंढरपूर शहरातील सि. स. नं. ३६९२ पैकी मध्यप्रदेश भवन समोरील शौचालय युनिट शेजारी गोपाळपूर रोडवर नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर व्यवसायासाठी ३ बाय ६ चौ. मी. मोजमापाची लोखंडी दुकाने नगरपरिषदे मार्फत तयार करुन २ वर्षे ११ महिने मुदतीने भाड्याने दिली जाणार आहेत. त्या दुकानांसाठी नापरतावा आधिमूल्य कमीत कमी रक्कम रुपये १,५०,०००/- आहे. यावर जास्तीत जास्त रकमेच्या निविदा मंजूर करण्यात येणार आहेत. अशी निविदा भरण्यासाठी व्यावसायिकांना रुपये ५००/- फॉर्म फी व रुपये ५,०००/- अनामत भरणे आवश्यक असल्याचे आपण जाहीर केलेल्या उपरोक्त विषयांकित निविदेमध्ये नमूद केले आहे. ही निविदा म्हणजे उपरोक्त जागेचा विकास करण्यासाठी अनेक वर्षांपासून अनंत हाल अपेष्टाचा सामना करीत वेळोवेळी पूर परिस्थितिशी झुंज देत आज पर्यंत रुपये १,५०,०००/- च्या कितीतरी पटीने अधिक खर्च करून आपला व्यवसाय टिकवून उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक व्यवसायीकांच्या धडपडीची अवहेलना असून कोरोना संकटात मृतवत झालेल्या, व्यवसायिकांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा निंदनीय राक्षसी प्रकार म्हणावा लागेल. म्हणून आम्ही पंढरपूर नगरपरिषदेची उपरोक्त निविदा त्वरित मागे घेण्याची विनंती करीत आहोत. तसेच पंढरपूर नगरपरिषदेने उपरोक्त जागेवर उभारण्यात येणारी लोखंडी दुकाने सद्या अस्तित्वात असलेल्या आम्हा व्यावसायिकांना मे.सर्वसाधारण सभा ठराव क्र.६६ दिनांक १८/०७/२०१८ ने ठराव की ( अ.वि.क्र.११ ) मध्ये नमूद ठरावास आधीन राहून अत्यल्प भाड्याने देण्यात यावीत. त्यानंतरच उर्वरित दुकानांचा बाजार मांडावा अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे केली जाणार आहे.
आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हा व्यावसायिकांना दि. १७/०२/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजले पासून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याने त्याची सर्वस्वी जबाबदारी पंढरपूर नगर परिषदेची राहील. एखाद्या जागेचा गरजवंताकडून मोफत विकास करून घेण्यासाठी जाणीवपुर्वक कानाडोळा करायचा आणि ती जागा पूर्ण विकसित झाल्यानंतर अतिक्रमणाचे नाव देत गरजू व्यावसायिकांना देशोधडीला लावायचे आणि पुन्हा अशा निविदा काढून पुतणा मावशीचे प्रेम दाखवायचे असे प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. त्यासाठी आम्हास बलिदानाची तयारी करावी लागली तरी चालेल, अशा स्वरूपाचे निवेदन खोकेधारकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. तसेच पंढरपुरातील सर्व राजकीय, सामाजिक संघटनांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.