ताज्याघडामोडी

विठ्ठल कारखान्यावर कै.भारत नाना भालके यांची जयंती साजरी

वेणुनगर: दि.१३- पंढरपूर तालुक्‍यातील वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी चेअरमन आमदार कै.भारतनाना भालके यांची जयंती शनिवार दि.१३.०२.२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. कारखाना कार्यस्थळावर साजरी करण्यात आली. या प्रसंगी आमदार कै.भारतनाना भालके यांचे प्रतिमेचे विधीपुर्वक पुजन कारखान्याचे संचालक श्री विजयसिंह देशमुख यांचे शुभहस्ते करण्यात आले.

आमदार कै.भारतनाना भालके यांना त्यांचे जयंतीनिमित्त आदरांजली वाहन्यासाठी सभेचे आयोजन
कारखाना कार्यस्थळावर केले होते. सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री लक्ष्मण नामदेव पवार म्हणाले
की, आजारी असतानाही त्यांना कारखाना व्यवस्थीत चालविणे हाच एकमेव ध्यास त्यांनी घेतला होता.
कोरोनाच्या काळातही त्यांनी सोमवार ते शुक्रवार असा मुंबई येथे प्रवास करुन कारखाना सुरु करणेसाठी रक्‍कम उपलब्ध करुन आणली. त्यामुळे आपण सर्वांनी कारखाना व्यवस्थीत चालविणे हीच खरी कै.आ.भारतनाना यांना श्रंध्दाजली ठरेल. या प्रसंगी संचालक श्री विजयसिंह देशमुख, अँंड.दिनकर पाटील,पवारसर व इतर मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्‍त केली.स दर कार्यक्रमास चेअरमन श्री भगिरथदादा भालके, व्हाईस चेअरमन श्री लक्ष्मणआबा पवार, जेष्ठ

संचालक श्री मोहनआण्णा कोळेकर, अँड.दिनकर पाटील, श्री दशरथ खळगे,श्री विलास देठे, श्री राजाराम
भिंगारे, श्री संतोष गायकवाड, श्री बाळासाहेब गडदे,श्री नारायण जाधव, कार्यकारी संचालक आर.एस .बोरावके,
सेक्रेटरी बी.सी.कर्पे, श्री विठ्ठल प्रशालेचे माजी प्राचार्य आर.डी.पवारसर तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग,
कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago