केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री ना.नितीन गडकरी हे गडकरी ऐवजी रोडकरी नावाने प्रसिद्ध झाले ते केवळ त्यांनी देशभरात रस्ते आणि महामार्ग बांधणीच्या कामाला दिलेली गती,विविध रस्त्यांच्या कामाला दिलेली मंजुरी आणि त्याचे फलित म्हणून आज पंढरपूर या तीर्थक्षेत्राला जोडणारे मजबूत चार पदरी कॉक्रीटचे महामार्ग हे होय.पंढरपूर महाड या रस्त्याच्या चौपदीकरणाबरोबरच कॉक्रीटीकरणाचा निर्णय महायुतीच्या सत्ता काळात झाला तेव्हा पंढरपूर शहरातील तालुका पोलीस ठाणे ते प्रबोधनकार ठाकरे चौक या रस्त्याच्या कामासाठी तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आग्रह धरून आ.प्रशांत परिचारक यांनी मंजुरी घेतली व निधीही उपलब्ध झाला.सुरवातीला या रस्त्याचे काम तीन पदरी प्रस्तावित होते पण आ.परिचारक यांनी पाठपुरावा करून या रस्त्याचे सुरु असलेले काम थांबवून हा रस्ता चौपदीकरण करण्यास मंजुरी आणली.पुढे तुळशी वृंदावनाच्या उदघाटन सोहळ्यात त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्यासमोर प्रबोधनकार ठाकरे चौक ते क्रांतीसिह नानासाहेब पाटील चौक या लिंकरोडच्या चौपदरीकरणासह कॉक्रीटीकरण करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आणि या रस्त्यासाठी ६ कोटी रुपयांचा निधीही जागेवरच मंजूर करण्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्रीसुधीर मुनगुंटीवार यांनी केली होती.
पंढरपूर शहरातील सरगम चौक ते क्रांतीसिह नाना पाटील चौक हा रस्ता अतिशय वर्दळीचा व अपघात प्रवण समजला जातो.या या रस्त्यावर किमान दुभाजक तरी केले जावेत अशी मागणी सातत्याने होत आली आहे.सध्या आळंदी-मोहोळ या पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे व कॉक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे व जून अखेर पर्यंत हे काम पूर्णत्वास जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आमदार प्रशांत परिचारक यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन वाखरी पर्यंत प्रस्तावित असलेला हा मार्ग पंढरपूर शहरास सरगम चौकापर्यंत जोडण्यात यावा.अन्य महामार्गाप्रमाणे या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे,कॉक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात यावे व प्रशस्त दुभाजक करण्यात यावा अशी मागणी केली आहे.या मागणीस ना. गडकरी यांनी हिरवा कंदील दाखविल्यास पंढरपूरकरांचा मोठा जिव्हळ्याचा प्रश्न सुटणार आहे.
त्याच बरोबर महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय महामार्ग ५४८-ई म्हसवड-पिलीव-भाळवणी-पंढरपूर या रस्त्यावरील भाळवणी गावातील रस्ता पिलीव प्रमाणे ६५ फूट (चौपदरी रस्ता) करावा अशीही मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी ना.गडकरी यांच्याकडे केल्याचे समजते.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…