नागपूर, 12 फेब्रुवारी: लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबीयांना महावितरणाने वाढीव वीजबिलं पाठवली आहेत. अशातचं नागपूर महावितरणाने एका कुटुंबाला तब्बल 1 लाख 43 हजार 300 रुपयांचं वीजबिल पाठवलं आहे. या घटनेमुळे नागपूर महावितरणाचा ओंगळ कारभार समोर आला आहे. लॉकडाऊच्या काळात राज्यसरकारने वीजबिल कमी करण्याचं आश्वासन दिलं असताना नागपूर महावितरणाने नागपूरमधील अब्दुल अल्ताफ यांना ऑगस्ट महिन्यात तब्बल 61 हजारांच वाढीव बिल पाठवलं होतं. तेव्हापासून त्यांचं बील थकीत राहिलं होतं. महावितरण प्रशासन एवढ्यावरचं थांबलं नाही, तर त्यांचं वीज कनेक्शनही खंडित केलं आहे. त्यामुळे त्यांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत.
याव्यतिरिक्त नागपूरच्या जयताळा भागात राहणाऱ्या अश्फाक शेख यांची तर कहाणी आणखी वेगळी आहे. अश्फाक हे एका मटणाच्या दुकानात काम करतात. जयताळा परिसरात त्यांचं दोन खोल्यांचं घर आहे. महावितरणाने त्यांना 59 हजार 450 रुपयांचं बिल पाठवलं आहे. महावितरणाच्या या गैरकारभारामुळे या कुटुंबाने धसकाच घेतला. आता सोमवारी महावितरणाने त्यांचा वीज मीटर काढून नेला आहे. त्यामुळे अश्फाक यांच्या कुटुंबीयांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. आता अश्फाक शेख यांनी राज्य सरकारला मदतीसाठी साकडं घातलं आहे.
यांच्या घरी हजारों रुपयांचे वीज बीलं पाठवली आहेत. त्यांच्या घरात इलेक्ट्रीन उपकरणं बोटावर मोजण्या इतकीच आहेत. त्यामुळे एवढं भरभक्कम बिल आलं कसं हा प्रश्न त्यांना देखील पडला आहे. महावितरणाच्या या हलगर्जीपणामुळे संबंधित कुटुंबातील वयोवृद्धांना आणि विद्यार्थांना याचा फटका बसत आहे. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी घरात सुविधा नसल्याने संबंधित कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…