ताज्याघडामोडी

तालुक्यात कोवीड लसीकरणासाठी सात लसीकरण केंद्रे सुरु आतापर्यत 1 हजार 600 जणांचे लसीकरण

पंढरपूर – कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी तालुक्यात 12 फेब्रुवारी पासून शहरासह ग्रामीण भागातही लसीकरण मोहिम सुरु करण्यात येणार आहे.  कोवीन ॲपवर नोंदणी केलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी  तसेच सरकारी, खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवा देणाऱ्या संबंधित कर्मचारी   यांच्या लसीकरणासाठी तालुक्यात सात लसीकरण केद्र सुरु करण्यात आली आहेत. तालुक्यात आतापर्यत 1 हजार 600 जणांना  कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी दिली.

 कोविड लसीकरण मोहिमेबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस तहसिलदार विवेक साळुंखे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अरविंद गिराम, पोलीस निरिक्षक प्रशांत भस्मे, सहायक गटविकास अधिकारी श्री.पिसे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

        कोविन ॲपवर नोंदणी  केलेल्या तालुक्यातील  सरकारी, खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवा देणाऱ्या संबंधित कर्मचारी तसेच महसूल, पोलीस, नगरपालीका, पंचायत समिती  येथील फ्रंटलाईन कर्मचारी यांच्यासाठी शहरासह ग्रामीण भागात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी शहरात उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय पंढरपूर, गॅलक्सी हॉस्पीटल, ॲपेक्स हॉस्पीटल, विठ्ठल हॉस्पीटल तसेच ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगांव, ग्रामीण रुग्णालय करकंब व प्राथमिक आरोग्य केंद्र गादेगांव येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. तरी संबधित नोंदणी केलेल्या सर्व कर्मचारी यांनी लसीकरासाठी नेमून दिलेल्या केंद्रावर  लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी केले आहे.

कोवीन ॲपवर नोंदनी केलेल्या संबधितांनी लसीकरण केंद्रावर येताना शासकीय ओळखपत्रासोबत पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बॅक पासबुकची झेरॉक्स अथवा मतदान ओळखपत्र घेवून यावे. कोविन ॲपवरील नोंदणी व्यतिरिक्त इतर कोणात्याही व्यक्तीला लस दिली जाणार नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर दुर्धर आजार  तसेच  गरोदर माता, स्तनदा माता यांनी  आपली माहिती कोवीन ॲपवर द्यावी जेणेकरुन लसीकरणाबाबत योग्य  निर्णय वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत घेण्यात येईल असेही डॉ.बोधले यांनी सांगितले.

 कोवीन ॲपवर नोंदणी केलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होवून, लसीकरण केंद्रावर लस घ्यावी. लसीचे कोणतेही दुषपरिणाम  दिसून आले नाही. तरी सबंधित अधिकारी कर्मचारी यांनी न घाबरता अथवा कोणत्याही अफवेवरती विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंध लस घ्यावी असे आवाहन तहसिलदार विवेक साळुंखे व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

17 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago