गेल्या ११ महिन्यापासून कोरोनामुळे आपल्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला,अनेक महिने लॉकडाऊन असल्यामुळे रोज भेटून एकमेकींची विचारपूस करणाऱ्या,संवाद साधणाऱ्या महिला वर्गास या काळात संपर्क विहीन रहावे लागले.मात्र संघर्ष परिवाराने या परिसरातील महिलांना या हळदी कुंकू समारंभाच्या निमिताने एकत्र आणून त्यांना मांगल्याचे प्रतीक असलेली भेट वस्तू देऊन संवाद साधण्याची संधी दिली हे खरोखरच कौतुकास्पद आहे अशी प्रतिक्रिया या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सीमा प्रशांत परिचारक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. मंगळवार दिनांक ९ रोजी येथील तांबडा मारुती मंदिर परिसरातील रेणुका देवी मंदिरात संघर्ष परिवाराच्या वतीने आयोजित तिळगुळ वाटप महिला स्नेह मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले ,सौ सीमाताई परिचारक, सौ विनयाताई परिचारक, उपनगराध्यक्षा श्वेताताई डोंबे, सौ दुर्गादेवी हरिदास, सौ.अमृता परिचारक,सौ गौरी उत्पात,नगरसेविका श्रीमती सुप्रिया डांगे,सौ सुजाता महाजन बडवे, सौ शामलताई शिरसट, सौ दिपाली शहा, एडवोकेट ज्ञानेश्वरी डांगे, सौ ज्योती बडवे, सौ वर्षा सुपेकर,सौ रेखा अभंगराव,सौ नंदा शहापूरकर, सौ रेणुका हरिदास, श्रीमती शकुंतला नडगिरे, सौ आसावरी पटवर्धन या उपस्थित होत्या.
यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना वरचेवर महिलांमध्ये राजकीय व सामाजिक जागृती होत आहे या बद्दल समाधान व्यक्त करून आता पर्यंत महिलांनी कुटूंब सक्षमपणे सांभाळले आता देशाचे रक्षण करण्यातही महिला पुढे आहेत असे गौरवोद्गार काढले.यावेळी त्यांनी महिलांनी आपल्या आरोग्याबाबतही दक्षता घ्यावी असे आवाहन केले.तर उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे यांनी उपस्थित महिलांना आपल्या भाषणाने प्रभावित केले.या कार्यक्रमाचे संयोजक राहुल परचंडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रशंसाही केली.
सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांसह महिला वर्गाचे स्वागत सौ.कुसुमताई परचंडे यांनी केले.सौ.सोनाली परचंडे,सौ.रुपाली संगीतराव,सौ.उमाताई परचंडे,सौ.कांचन पाठक,सौ. कविता मेटकरी,सौ.शरदाताई खंडागळे,सौ.ज्योती परचंडे यांच्यासह परिसरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.