ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यात 1 हजार 309 नोंदीचे निर्गतीकरण- प्रांताधिकारी-सचिन ढोले

 पंढरपूर, दि. 09:-  फेरफार नोदींचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचनेनुसार तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने विशेष अभियान राबविण्यात आले. यामध्ये तालुक्यातील नोंदणीकृत व अनोंदणीकृत 1 हजार 309 नोदींचे निर्गतीकरण करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

  जिल्ह्यासह तालुक्यातील प्रलंबित प्रकरणांची जलदगतीने निर्गती व्हावी यासाठी  दिनांक 1 ते 10  फेब्रुवारी 2021 या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात आले होते. पंढरपूर तालुक्यातील 9 मंडळातील 1 हजार 309 नोंदणीकृत व अनोंदणीकृत प्रलंबित  नोदींचे प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये  पंढरपूर -219, भाळवणी -132, कासेगांव-210,चळे 62, करकंब-148,तुगंत -77, पुळूज-56, भंडीशेगांव-262 तसेच पटकुरोली-143 मंडळातील प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी ढोले यांनी दिली

तालुक्यातील नागरिकांनी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे असलेल्या प्रलंबित प्रकरणांची जलदगतीने निर्गती होण्यासाठी तसेच फेरफार नोदींसाठी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार विवेक साळुखे यांनी यावेळी केले.

या अभियानातंर्गत बुधावर दिनांक 10 फेब्रुवारी 2021 रोजी निकाली नोदींच्या प्रकरणांचे वितरण तहसिलदार विवेक साळुंखे यांच्या हस्ते प्रांत कार्यालय सांस्कृतिक भवन येथे करण्यात  आले. यावेळी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांच्यासह महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

17 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago