पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाकडून मागील पाच दिवसापासून सुरु असलेल्या ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’चा समारोप करण्यात आला. यामध्ये संशोधक व प्राध्यापकांनी ‘व्हीअरेबल डीवायसेस अँड इट्स टेक्नोलॉजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘व्हीअरेबल डीवायसेस अँड इट्स टेक्नोलॉजी’ हे तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही अटल (एआयसीटीई, ट्रेनींग अँड लर्नींग अॅकेड्मी) प्रायोजित कार्यशाळा स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाकडून ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. स्वेरी विविध बौद्धिक उपक्रमांसाठी नेहमीच प्रोत्साहन देत असते आणि त्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते यांच्या नेतृत्वाखाली ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ची पाच दिवस बौद्धिक मेजवानी मिळाली. प्रास्तविकात कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. महेश मठपती यांनी या ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ वर विशेष प्रकाश टाकला. या कार्यशाळेसाठी अॅकॅडमिया लॅब सोलुशन पुण्याचे अनिरुद्ध कुलकर्णी व महेश मुंडे यांनी ‘व्हीअरेबल अँटेना आणि त्यांचे विविध प्रकार’ यावर सविस्तर माहिती दिली.एमआयटी पुण्याचे डॉ. आर. एस. भडादे यांनी ‘मॅसिव्ह मिमो अँटेना’ या विषयावर, एनआयटी जमशेदपूरचे डॉ. बासुदेव बेहरा यांनी ‘अॅडव्हान्स अॅक्चूएटर फॉर व्हीअरेबल डीवायसेस तसेच सर्फेस अॅकॉस्टीक वेव्ह बेस्ड अॅक्चूएटर फॉर रियल टाईम अॅप्लीकेशन्स’ या विषयावर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)च्या आयआयटीएमचे डॉ. पिंकू रंजन यांनी ‘डायइलेक्ट्रीक रेझोनेटर अँटेना’ या विषयावर, बिदर (कर्नाटक) च्या जी.एन.डी.सी कॉलेजचे डॉ. वीरेंद्र डाकुळगी यांनी ‘अँटेना फॉर रिमोट हेल्थ केअर मॉनेटरिंग’ या विषयावर, शेगावच्या श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा.विवेक रत्नपारखी यांनी ‘कम्युनिकेशन टेक्नोलॉजी फॉर आयओटी बेस्ड विअरेबल डीवायसेस’ या विषयावर तर एनआयटी भोपाळ (मध्यप्रदेश) चे डॉ. विजय भास्कर यांनी ‘विअरेबल सेन्सर बेस्ड ह्युमन हेल्थ मॉनेटरिंग युजींग गेन अँड पुश रिकवरी अॅनालिसीस’ या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळा ही ‘गुगल मीट’ या अॅपद्वारे ऑनलाईन संपन्न झाली. या कार्यशाळेला दररोज जवळपास दीडशे संशोधक, प्राध्यापक उपस्थित होते. ही ऑनलाइन कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.