ताज्याघडामोडी

सुजय विखे पाटील-रोहित पवार यांची छुपी युती

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा बँकेची येत्या 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक आहे. मात्र त्यापूर्वीच जिल्हा बॅंकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय कुरघोड्यांना उधाण आले आहे. जामखेड विविध सेवा मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात यांची बिनविरोध निवड होणार आहे. राष्ट्रवादी आमदार रोहित पवार आणि भाजप खासदार सुजय विखे यांच्या छुप्या युतीमुळे जगन्नाथ राळेभात यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु या छुप्या युतीचा फटका भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना बसला आहे.

जगन्नाथ राळेभात आणि त्यांचा मुलगा अमोल राळेभात यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी अर्ज भरला. यामुळे निवडणुकीत उत्कंठा वाढली होती. मात्र ऐनवेळी पवार-विखे यांच्या छुप्या युतीमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या संचालकपदी जगन्नाथ राळेभात यांची बिनविरोध निवड होणार आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन बिनविरोध निवडीचा निर्णय घेतला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोसले यांनी सांगितले.

आतापर्यंत 21 पैकी चार जागा बिनविरोध झाल्या असून यातील तीन जागा विखेंच्या ताब्यात गेल्या आहेत. ही निवडणूक नेहमीच विखे पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकामध्ये रंगते. यावेळी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. अशात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी विखे यांना सहकार्य केल्याची चर्चा आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

7 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago