चंद्रभागानगर (दि.०९)ः- सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे यांच्या १९ व्या पुण्यतिथी निमित्त सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखाना कार्यस्थळावर कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेमार्फ़त आयोजित करण्यात आलेल्या किर्तन सोहळ्याची सांगता मळोली (ता.माळशिरस) येथील गुरुवर्य ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर यंाच्या काल्याच्या किर्तनाने झाली. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळे, व्हा.चेअरमन मा.श्री.राजेंद्र शिंदे उपस्थित होते. प्रारंभी संस्थापक चेअरमन स्व.वसंतराव (दादा) काळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन करण्यात आले.
काल्याच्या किर्तनामध्ये, ‘‘ एकमेका देऊ मुखी, सुखी घालु हुंबरी… ‘‘ जगतगुरु तुकोबारायांच्या या अभंगाचे निरुपण करताना ह.भ.प.बापूसाहेब महाराज देहूकर यांनी गोकुळातील श्रीकृष्ण लिलांचे वर्णन करताना सहकाराची कल्पना श्रीकृष्णाने तेव्हा रुजविल्याचे सांगत प्रतिकुल परस्थितीत संस्थापक वसंतराव काळे यांनी भाळवणीच्या माळरानावर सहकार मंदिर उभारुन शेतकरी व कामगारांचा उध्दार केल्याचे सांगितले. चेअरमन कल्याणराव काळे यांनी त्यांच्या आचार-विचारांचा वारसा सक्षमपणे चालवित असल्याचेही त्यांनी नमुद केले.
सहकार शिरोमणी कारखान्याचे संस्थापक, सहकार शिरोमणी स्व.वसंतराव (दादा) काळे यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त कारखाना कार्यस्थळावर दरवर्षी धार्मिक व सामाजिक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उर्वरीत कार्यक्रमांना फ़ाटा देत सामाजिक अंतराचे भान ठेवुन २ ़ते ९ फेब्रुवारी पर्यत केवळ किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर किर्तन सोहळ्यामध्ये प्रसिंध्द किर्तनकार ह.भ.प. मच्छिंद्र महाराज कावडे, ह.भ.प.शक्ती महाराज चव्हाण, बालकिर्तनकार ह.भ.प. भक्ती महाराज देठे, ह.भ.प.निवृत्ती महाराज नामदास, ह.भ.प. प्रदिप महाराज ढेरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पवार, ह.भ.प.एकनाथ महाराज चौगुले यांनी या किर्तन सोहळ्यात किर्तन सेवा देवून उपस्थित भाविक भक्तांना आपल्या सुमधुर वाणीने मंत्रमुग्ध केले. काल्याचे किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ा किर्तन सोहळ्याचे व्यवस्थापक म्हणुन कारखान्याचे मा.संचालक शहाजी पासले, संचालक भारत कोळेकर, व ह.भ.प.धनंजय महाराज गुरव यांनी काम पाहिले.
याप्रसंगी मा.व्हा.चेअरमन मारुती भोसले, संचालिका मालनबाई काळे, सौ.संगिताताई काळे, संचालक सर्वश्री मोहन नागटिळक, बाळासाहेब कौलगे, भारत कोळेकर, राजाराम पाटील, ऍड.तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, योगेश ताड, युवराज दगडे, इब्राहिम मुजावर, अरुण बागल, नागेश फ़ाटे, माजी संचालक शहाजी पासले, राजसिंह माने, संभाजी बागल, तानाजी जाधव, तुकाराम माने, कार्यकारी संचालक प्रदिप रणनवरे, डेप्यु.जनरल मॅनेजर कैलास कदम,कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष व कारखान्याचे सिव्हिल इंजिनिअर नानासाहेब काळे, सेक्रेटरी एम.आर.मदारखान, वर्क्स मॅनेजर जी.डी.घाडगे, प्रोडक्शन मॅनेजर एन.एम. कुंभार, डिस्टीलरी मॅनेजर पोपटराव घोगरे, चिफ़ इंजिनिअर सुखदेव औताडे, शेती अधिकारी पी.जी.शिंदे, लेबर ऑफ़िसर राजकुमार जाधव, परचेस ऑफ़िसर सी.जे.कुंभार, कार्यालय अधिक्षक सी.एस.गायकवाड, कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेचे उपाध्यक्ष व केनयार्ड सुपरवायझर डी.डी.काळे व सभासद शेतकरी, विविध विभागातील खातेप्रमुख व कर्मचारी, परिसरातील भाविक मोठ्या संखयेने उपस्थित होते.