बारा बलुतेदार अलुतेदार बहुजन संस्थेच्या वतीने सोमवारी पंढरपुरात आयोजित करण्यात आलेल्या विचारविनिमय व पदाधिकारी निवड बैठकीच्या निमित्ताने पंढरपूर नगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल विजय वरपे,जगदीश जोजारे व शिवाजी अलंकार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे संस्थापक भाई किशोर भोसले यांच्या मार्गदशनाखाली विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ शहापूकर हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाई किशोर भोसले म्हणाले कि,संख्येने अल्प असलेल्या व बलुतेदारी,आलुतेदारी करीत जीवन जगत आलेल्या समाजांमध्ये आपल्या लोकशाही व राजकीय घटनात्मक हक्काबद्दल जनजागृती करून शासन व्यवस्था आणि समाज व्यवस्थेत दुर्लक्षित राहिलेल्या या विविध समाज बांधवाना संघटित करण्याचा आपला प्रयत्न असून यासाठी सर्व पदाधिकारी नक्कीच हे अभियान यशस्वी करतील.
यावेळी संस्थेच्या नूतन पदाधिकऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून प्रदेश संघटकपदी तेजस भोसले,पश्चिम म.अध्यक्ष दादासो माने,सोलापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी नवले,पंढरपूर तालुकाध्यक्ष आनंद शिंदे,शहर अध्यक्ष विशाल इंदापूरकर,शहर उपाध्यक्ष प्रमोद घोडके,शहर सचिव नागनाथ माने,मंगळवेढा तालुका महिला अध्यक्ष लता माने यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
या वेळी जितेंद्र भोसले,नानासो साळूंखे,पांडुरंग डांगे,प्रमोद भोसले,बबलू सावंत,राजू गायकवाड,आबा बंदपट्टे,विलास मेडशिंगीकर,अमोल घोडके,बिभीषण माने,उद्धव ननवरे,प्रीतम भोसले यांच्यासह बारा बलुतेदार,अलुतेदार समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…