ताज्याघडामोडी

गोकुळ शुगर्सचे चेअरमन भगवान शिंदे यांचा संशयास्पद मृत्यू

गोकुळ शुगर उद्योगाचे अध्यक्ष भगवान शिंदे यांचा मृतदेह सोलापूर येथे रेल्वे रुळांवर आढळून आला. शिंदे यांच्या मृत्युमुळे एकच खळबळ उडाली असून, ही हत्या की आत्महत्या याबाबत संशय निर्माण झाला आहे. पोलीस मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहेत. ही घटना आज (सोमवार, 8 फेब्रुवारी 2021) सकाळी घडली.

दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेल्या धोत्री येथील गोकुळ शुगर उद्योगाचे भगवान शिंदे हे अध्यक्ष होते.प्राप्त माहितीनुसार, भगवान शिंदे हे आज पहाटे नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. नियमीतपणे ज्या वेळेला ते घरी परततात त्या वेळी ते परतले नाहीत. बराच वेळ उलटूनही ते परत आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोध घेऊनही शिंदे यांचा थांगपत्ता लागला नाही. अखेर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत माहिती दिली.

दरम्यान, सोलापूरातील मोदी स्मशानभूमी मार्गावर असलेल्या पुलाजवळ एक मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना प्राप्त झाली. सदर घटनेची माहिती पोलिसांनी शिंदे कुटुंबीयांना दिली. शिंदे कुटुंबीयांनी जाऊन पाहिले असता हा मृतदेह भगवान शिंदे यांचाच असल्याचे पुढे आले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

16 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago