ताज्याघडामोडी

कोरोना योद्ध्याच्या सन्मानासाठी तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर राजकारणाच्या पलीकडेही ‘ माणुसकीचा धागा ‘ मजबूत :  आ प्रशांत परिचारक

 ढरपूर / प्रतिनिधी : कोरोना महामारी च्या संकटाने माणुसकी शिकवली आणि याचा गौरव करण्यासाठी भालके – परिचारक आणि अवताडे यांना एकाच धाग्यात गुंफत राजकारणाच्या पलीकडे जाऊन ‘ माणुसकीचा धागा ‘  जोडता येतो हे देखील या कार्यक्रमात वरून दिसून आले असे उद्गार आ. प्रशांत परिचारक यांनी काढले. 

बडवे समाज आणि संत प्रल्हाद महाराज प्रतिष्ठान च्या वतीने आ. प्रशांत परिचारक, ‘  विठ्ठल ‘ चे चेअरमन भगीरथ भालके आणि ‘ दामाजी ‘  चे चेअरमन समाधान अवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना योद्ध्यांचा  सत्कार आयोजित करण्यात आला होता.  त्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर  ह-भ-प राणा महाराज वासकर , विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी , प्रतिष्ठानचे श्री अनिरुद्ध बडवे , अनंत बडवे,  वैभव बडवे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी सुमारे 72 योद्ध्यांचा सत्कार आ. परिचारक , भालके आणि अवताडे यांच्या हस्ते करण्यात आला .
समाधान आवताडे यांनी सांगितले की , कोरोनामुळे झालेले नुकसान भरून येण्यासाठी आता अधिक उमेदीने आणि गतीने अर्थकारण आणि समाजजीवन प्रवाहीत होण्याची गरज आहे , अशा सन्मानामुळे ही  गती अधिक वाढेल .
भगीरथ भालके यांनी सांगितले की , कोरोना हा एक आयुष्याला मिळालेला धडा होता आणि यातून समाजजीवनातील एकोपा किती गरजेचा आहे हे समोर आले.
विठ्ठल जोशी यांनी सांगितले , कोरोना चे संकट संपलेले नाही परंतु योध्या आता विस्मृतीत जात आहे सातत्याने योध्याचे हे उपकार समाजासमोर ठेवण्यासाठी हे विसरू न देण्याची जबाबदारी या समाजाची आहे , या दृष्टीने असे सत्कार सोहळे सातत्याने आणि सदैव घडले पाहिजेत .
अध्यक्षीय भाषणात ह.भ.प. वासकर यांनी सांगितले ,  वारकरी संप्रदायाचे फार मोठे योगदान या महामारीच्या संकट निवारण्यासाठी झाले . देवाची आणि वारकऱ्यांची भेट टाळून विरहात्मक योगदान देखील वारकर्‍यांनी दिले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिरूद्ध बडवे यांनी तर सूत्रसंचालन वैष्णवी बेणारे यांनी केले . आभार  वैभव बडवे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष बडवे , दर्शन बडवे , श्रीराम बडवे यांनी परिश्रम घेतले
उपेक्षित घटकांचाही सन्मान
कोरोना योद्ध्यांचे सत्कार सोहळे अनेक झाले परंतु अगदी खालच्या स्तरावर प्रत्यक्ष राबणारे अनेक घटक दुर्लक्षित राहिले होते , अशा सर्वांना एकत्रित करून यावेळी सन्मानित करण्यात आले याबद्दल अनेक वक्त्यांनी समाधान व्यक्त केले .
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

24 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

24 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago