२१ किमी हाफ मॅरेथॉन मध्ये चिंचोली-भोसेच्या चि.विकास शिंदेची विक्रमी कामगीरी
रनर्स असोसिएशन पंढरपूर आयोजित DVP व्हर्च्युअल मॅरेथॉन आज रेल्वे मैदान पंढरपूर येथे संपन्न झाले. यावेळी DVP उद्योग समूहाचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या शुभेच्छांनी मॅरेथॉनची सुरुवात झाली.
या मॅरेथॉनशमध्ये ५किमी,१० किमी व २१ किमी धावणाऱ्या अनेक धावपटूंनी सहभाग नोंदवला. २१ किमी हाफ मॅरेथॉन मध्ये पंढरपूर चिंचोली-भोसेच्या चि. विकास शिंदे यांनी १तास १५ मिनिटांचा विक्रम नोंदवत ही मॅरेथॉन पूर्ण केली. असून त्यांचे विशेष कौतुक अभिजीत पाटील यांनी केले. आरोग्य आणि सुदृढ जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी तसेच आरोग्यवान नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी या DVPमॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षीपासून सुरू असलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर सुदृढता आणि आरोग्याविषयी अधिकाधिक लोक जागृत व्हावेत यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबिली गेली. प्रत्येक स्पर्धकाने आहे. आपआपल्या ठिकठिकाणी स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यात संपूर्ण महाराष्ट्रातून यास उस्फुर्त प्रतिसाद प्राप्त झाला. आरोग्याविषयी यामुळे जनजागृती होण्यास सहाय्य झाले तसेच पंढरपूरचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गौरविले गेले याचे वेगळे समाधान वाटते असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…