राज्यात सार्वधिक गाळप करणारा साखर कारखाना म्हणून गणला गेलेल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पुढील पाच वर्षासाठी संचालक मंडळ निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून सहकारी साखर कारखाना म्हणून नोंदणीकृत झालेल्या या साखर कारखान्यात शासन नियुक्त संचालक म्हणून भाजपचे तत्कालीन तालुका अध्यक्ष संजय कोकाटे यांची निवड झाली होती.या निवडीनंतर संजय कोकाटे यांनी कारखान्याच्या लोकनियुक्त संचालक मंडळा विरोधात सातत्याने आरोप,आंदोलनाचा मार्ग अवलंबल्यामुळे त्यावेळी राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे या कारखान्याच्या संचालक मंडळ व व्यवस्थापनास प्रचंड त्रास सहन करावा लागल्याची चर्चा होत होती.यातूनच कारखान्याकडे असलेले शासकीय भागभांडवल परत करीत कारखाना मल्टीस्टेट करण्याचा प्रस्ताव वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडला होता.त्यास सभासदांनी बहुमताने मंजुरी दिल्यानंतर आता प्रथमच संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणूक होत असून निवडणूक निणर्य अधिकारी कुंदन भोळे यांनी या बाबत जाहीर प्रसिद्धीकरण केले आहे.
२१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कारखाना स्थळावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडून द्यावयाच्या एकूण जागाइतकेच अर्ज प्राप्त झाले तर हि निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडणार आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…