ताज्याघडामोडी

भाजपला धक्का, 3 वेळा आमदार राहिलेल्या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई, 6 फेब्रुवारी : भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. हेमेंद्र मेहता भाजपच्या चिन्हावर तीनवेळा पूर्वीच्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे मेहता यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून मुंबईमध्ये भाजप पक्ष वाढीसाठी झटणारे नेते अशी हेमेंद्र मेहता यांची ओळख आहे. मात्र गेल्या काही काळापासून ते भाजपच्या नेतृत्वावर नाराज होते. त्यामुळे अखेर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला.

मेहता यांच्या पक्ष प्रवेशावेळी शिवसेना खासदार अनिल देसाई, आमदार विलास पोतणीस, युवासेना सचिव वरूण सरदेसाई हे देखील उपस्थित होते.दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या भाजपमध्ये विविध पक्षांतून प्रचंड प्रमाणात इनकमिंग झालं त्याच भाजपमधून आता आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. तसंच अलिकडील काळात भाजपमधून काही माजी आमदारांनीही इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

6 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago