बीड : खळबळजनक बातमी बीडमधून. मुलगा व्हावा म्हणून पतीने पत्नीला बेदमपणे मारहाण करत रात्रभर बांधून ठेवले. त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला. मुलाच्या हव्यासापोटी स्वत:च्या पत्नीला डांबूने रात्रभर बेदम मारहाण केल्याने अती रक्तस्त्राव होवून पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगपूर शिवारात घडली. या घटनेने संताप व्यक्त होत आहे.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या पत्नीला आता मुल होणार नाही. पुन्हा मूल होण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार, या संतापातून पतीने पत्नीला जबर मारहाण केली आणि तिला रात्रभर बांधून ठेवले. त्यामध्ये अधिक रक्तस्त्राव झाल्यानं पत्नीचा मृत्यू झालाय. पोलिसांनी आरोपी महादेव रेड्डे याला अटक केली आहे. महादेव आणि राधाला एक मुलगा आणि मुलगी अशी दोन मुले होती. मात्र दोन वर्षांपूर्वी आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…