२०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेद्वारा विरोधात काम केलेला नेता मग तो कोण आहे याची फिकीर न करता त्याला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असे विधान राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.इंदापूर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तालुका कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि,२०१९ च्या निवडणुकीत राज्यात भाजपाच पुन्हा सत्तेत येणार असा भ्रम असलेले काही लोक पक्षापासून दुरावले.मात्र त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे ते लोक आज पक्षाच्या दारात प्रवेशासाठी उभा रहात आहेत.मात्र राष्ट्रवादी कॉग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नसून अस्मिता आहे आणि विरोधात काम केलेल्या जित्राबांना आता पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असे विधान त्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे सत्ता असो अथवा नसो राष्ट्रवादी कॉग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकत्यांचा मात्र उत्साह वाढला असून अजित पवार यांनी हे वक्तव्य पक्षांतर्गत विरोधकांबाबत केले आहे त्याच वेळी २०१४ ते १९ या महायुतीच्या सत्ताकाळात जे राष्ट्रवादी सोडून गेले त्यांच्याबाबत पक्षाची हीच भूमिका राहावी अशी अपेक्षाही कट्टर राष्ट्रवादी समर्थक व्यक्त करीत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…