ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठीचं अवघड काम आता सोपं होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेल्या तरतूदीनुसार, वाहन चालवण्याच्या परवाण्यासाठी आता कोणालाही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. या खास योजनेवर काम सुरू असून मंत्रालयाने यासाठी अधिसूचनाही जारी केल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार, ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरमधून गाडी शिकत असल्यास ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता टेस्टची गरज नाही. सरकारच्या या नवीन योजनेंतर्गत मंत्रालय टेस्टसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता देणार आहे. जेणेकरून ते त्याची अंमलबजावणी करतील. यासाठी मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या खास सेवेसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करणं महत्वाचं आहे. तसेच या खास योजनेबद्दल अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात येणार असल्याचेही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…