पंढरपूर : आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणेच नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाची माघी यात्राही भाविकांविनाच साजरी करावी लागणार आहे. याकाळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी वारकरी संप्रदायाच्या चैत्री , आषाढी व कार्तिकी या मोठ्या यात्रा होऊ शकल्या नव्हत्या. अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने कोरोनाचे नियम 29 फेब्रुवारीपर्यंत सुरु ठेवल्याने यात्रा जत्रा भरण्यास मनाई करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायाची नवीन वर्षात येणार माघी यात्रेचा सोहळा 23 फेब्रुवारी रोजी होत असल्याने प्रशासनाने या यात्राही भाविकांविना करण्याचे नियोजन करीत आहे. त्यानुसार मंदिर समितीने 22 व 23 फेब्रुवारी रोजी विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून या काळात मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवं , प्रदक्षिणा मार्ग या भागात 144 कलम पुकारून संचारबंदीचा प्रस्ताव शासनाकडे दिल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…