ताज्याघडामोडी

अंधश्रद्धेच्या नावाखाली 2 किलो सोनं पुरुन 25 लाख खर्च

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी देवस्थानच्या तत्कालीन विश्वस्थ मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली मोहटादेवी मंदिरात सुमारे 2 किलो सोने पुरून त्यावर मंत्रोपचारासाठी 25 लाख रुपये खर्च केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आणि माहूरच्या रेणुका मातेचे माहेरघर म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेले मोहटा देवी देवस्थान प्रसिद्ध आहे अहमदनगर जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. 2010 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी मंदिर बांधताना मंदिराच्या पायामध्ये 1890 ग्रॅम सोनं पुरलं होतं. हे सोनं पुरताना त्याच्यावर मंत्रोच्चार देखील करण्यात आले आणि या सर्व प्रक्रियेसाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च करण्यात आला. या सर्व अंधश्रद्धेमुळे केल्यामुळे तत्कालीन विश्वस्त प्रकाश गरड यांनी आवाज उठवला आणि न्यायालयात याचिका दाखल केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

23 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago