पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढी विरोधात पंढरपुरात शिवसेनेची निदर्शने

बैलगाडीत मोटार सायकल ठेवून अनोखे आंदोलन

देशातील सर्वसामान्य माणूस सतत होणार्या इंधन दरवाढीमुळे तो मेटाकुटीस आला आहे. पेट्रोल, डिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठेल अशी अवस्था असून इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडत आहे.तर घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दरही मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत.देशातील जनतेत प्रचंड संताप असताना केंद्र सरकार मात्र मूग गिळून बघ्याची भुमीका घेत आहे असा आरोप करीत आज शिवसेनेच्या वतीने तहसील कायार्लयासमोर  निदर्शने करीत चूल मांडून केंद्र सरकारचा निषेध करत असल्याचे निवेदन तहसीलदार विवेक साळूंखे याना देण्यात आले.
      यावेळी बोलताना शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले कि, गेल्या काही महिन्यांपासून  पेट्रोल, डिझेल दरवाढ सतत सुरूच आहे.गेल्या चार वर्षांपूर्वी क्रूड तेलाचे जे दर होते तेच दर आजही कायम आहेत तरीही देशात इंधनाचे वाढत आहेत.कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यायचा नाही अशीच केंद्र सरकारची नीती आहे. महागाईच्या या भडकणाऱया वणव्यातून सर्वसामान्यांना बाहेर काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले आहे.
    यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव,शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैलाताई गोडसे,तालुका प्रमुख महावीर देशमुख,शहर प्रमुख रवी मुळे,जयवंतराव माने,मा.शहर प्रमुख संजय घोडके,माउली अष्टेकर,काका बुराडे, प्रवीण शिंदे,महेश इंगोले,सुधाकर माळी,शांताराम यादव,नागेश पाटील,पोपट इंगोले,जयसिंग पवार,दामोदर ताटे,रणजित कदम,विलास चव्हाण,संजय कांबळे,शिवाजी जाधव,हरिभाऊ गाजरे,विजय करपे,कल्याण कवडे,उमेश काळे,रणजित कदम,बाळासाहेब पवार,उपशहर प्रमुख लंकेश बुराडे,विनय वनारे,नाना सावंतराव,सचिन बंदपट्टे,तानाजी मोरे,विभागप्रमुख पंकज डांगे,अरुण कांबळे,सूरज गायकवाड,विलास थोरात,बाबा अभंगराव,ईश्वर साळूंखे,गणेश वाघमारे,महिला आघाडी शहर प्रमुख पूर्वा पांढरे,तालुका प्रमुख आरती बसवंती,संगीता पवार,रेहाना आतार,शेख भाभी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago