उमेश परिचारक खरेच रासपात जाणार ?

विशेष आर्टिकल

राजकुमार शहापुरकर (संपादक -पंढरी वार्ता )

 

सोलापूर जिल्ह्याच्या राजकरणात एक प्रभावशाली राजकीय कुटूंब म्हणून ज्या परिचारक या नावाचा दबदबा आहे त्या परिवारातील प्रत्येक निवडणुकीत महत्वपूर्ण भूमिका पार पडणारे युटोपियन साखर कारखान्याचे चेअरमन व पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक हे राष्ट्रीय समाज पक्षात येणार असे भाकीत नुकतेच पंढरपूर दौऱ्यावर आल्यानंतर रासपाचे अध्यक्ष व माजीमंत्री महादेव जानकर यांनी केले आहे.त्यांच्या या विधानाकडे ”राजकीय भूकंपाची तयारी” म्हणूनही पाहिले जात असतानाच उमेश परिचारक यांच्या गेल्या तीस वर्षातील राजकीय वाटचालीचा अभ्यास असलेले त्यांचे समर्थक व राजकीय जानकार हे महादेव जानकर यांच्या भाकितावर उपरोधिक मत व्यक्त करताना दिसून येत असून विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक हे जर भाजपात प्रवेश करणार असतील तर उमेश परिचारक हे रासपात कशाला जातील असाही सवाल उपस्थित करीत आहेत.व गेल्या २५ वर्षाच्या वाटचालीत उमेश परिचारक यांनी परिचारक गटाच्या विजयासाठी ”किंगमेकर” ची भूमिका अतिशय प्रभावीपणे पार पाडली असताना ते राष्ट्रीय समाज पक्षात का जातील असाच प्रतिप्रश्न उपस्थित करीत आहेत.       

     २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघ हा रासपच्या वाट्यास आला.भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असलेल्या आ.प्रशांत परिचारक यांनी रासपच्या कपबशी चिन्हावर निवडणूक लढविली.मात्र २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत हा विधानसभा मतदार संघ हा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या ”रयत” च्या वाट्यास गेला तरी कमळ हे चिन्ह घेऊनच स्व.आ.सुधाकरपंत परिचारक यांनी निवडणूक लढविली.तर पुढे २०१६ मध्ये झालेल्या पंढरपूर नगर पालिकेच्या निवडणुकीत उमेश परिचारक हे अध्यक्ष असलेल्या पंढरपूर -मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी थेट भाजपशी आघाडी करीत निवडणूक लढविली तर पुढे २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत याचीच पुनरावृत्ती झाली.यात पंढरपूर तालुक्यात असलेल्या रासपा पेक्षा भाजपालाच प्राधान्य दिले गेले.     

 २०१९ नंतर आणि तत्पूर्वीही रासपाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर हे अनेकवेळा पंढरपूर तालुक्याच्या दोऱ्यावर आले पण त्यांच्या दौऱ्याच्या वेळी उमेश परिचारक हे कधीच आवर्जून उपस्थित राहीले नाहीत असे असताना माजी मंत्री महादेव जानकर यांचे ” राजकीय भूकंपाचे भाकीत खरे ठरणार कि राजकीय जोक” हे येणाऱ्या काळात दिसून येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.    

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago