कोल्हापूरच्या पावनगडावर शिवकालीन ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. पावनगडावर शेकडोच्या संख्येने तोफ गोळे सापडले असून, आणखी हजारो तोफ गोळे सापडण्याची शक्यता वनविभाग आणि टीम पावनगड या संघटनेने व्यक्त केली आहे. पावनगडावर दिशादर्शक फलक लावत असताना तोफेचे गोळे मिळाले आहेत.
ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या बाजूलाच असणाऱ्या पावन गडावर हे तोफगोळे सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः पावनगडाची निर्मिती केली होती. 406 तोफगोळे सापडले अजून हजारो असण्याची शक्यता वनविभाग आणि टीम पावनगड यांचे म्हणणे आहे.
वनविभाग आणि टीम पावनगड ही संघटना पावन गडावरवर दिशादर्शक फलक लावण्याचे काम करत आहेत. याचवेळी फलकासाठी खड्डा काढत असताना गडावरील महादेव मंदिराशेजारी हे गोळे सापडले. स्थानिकांच्या माहितीनुसार पूर्वीच्याकाळी याठिकाणी दारू गोळ्याचे कोठार होते.
राज्य शासनाने गड किल्ले संवर्धन करताना ज्याठिकाणी ऐतिहासिक वास्तु, पुरावे मिळण्याची शक्यता आहे असे गड किल्ले ताब्यात घेतले पाहिजेत. सध्याच्या घडीला राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाने पावनगड ताब्यात घेऊन तेथे तातडीने उत्खनन करावे. जेणेकरून इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा, अनमोल वस्तू पुढे येतील. तसेच राष्ट्राच्या संपत्तीचे जतन संवर्धन आणि संरक्षण होईल असे राम यादव (सदस्य रायगड प्राधिकरण/ इतिहास अभ्यासक) यांनी म्हटले आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…