कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकरी-धंद्यांवर गदा आली, रोजगार बुडाले. संसाराची विस्कटलेली घडी कशी बसवायची या चिंतेत देशातील सर्वसामान्य माणूस असताना सतत होणार्या इंधन दरवाढीमुळे तो मेटाकुटीस आला आहे. पेट्रोल, डिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठेल आणि महागाईचा भडका आणखीनच उडेल या चिंतेने देशातील जनतेत असंतोष पसरला आहे. शिवसेना या देशातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभी असून 5 फेब्रुवारी रोजी 11 वाजता या पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध व्यक्त करण्यासाठी निदर्शने करण्यात येणार असून त्याच बरोबर नजीकच्या पेट्रोलपंपावर शिवसैनिक ठिय्या आंदोलन करणार आहेत.तरी या आंदोलनात शिवसैनिकांबरोबरच नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल दरवाढ सतत सुरूच आहे. कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यायचा नाही अशीच केंद्र सरकारची नीती आहे. महागाईच्या या भडकणाऱया वणव्यातून सर्वसामान्यांना बाहेर काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना 5 फेब्रुवारी रोजी 11 सकाळी वाजता पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात हे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी होणार आहेत अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…