चार पिढ्याच्या विश्वासार्हतेचे केले कौतूक
राज्यात शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय आणि अनुदानाशिवाय पारंपरिकरित्या म्हशींचे संगोपन करीत गवळी समाजाने या व्यवसायातील विश्वासहर्ता जपली असून गवळी समाजाने दुष्काळात देखील कुटूंबातील सदस्य असल्याप्रमाणे जोपासलेल्या पंढरपुरी म्हशी हा एक शासनमान्य ब्रँड बनला आहे.पंढरपुरात गेल्या चार पिढ्यापासून गवळी समाजातील औसेकर नाव नसून ब्रँड ठरला असून या परिवारातील अप्पा औसेकर पारंपरिक रित्या म्हशींचे संगोपन करतानाच यास आधुनिक डेअरी फर्मचे रूप दिले आहे.सातारा गादीचे वारसदार असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याप्रती नितांत आदर असलेले संत तनपुरे महाराज मठाजवळील औसेकर परिवार आज श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी औसेकर दुग्धालयास भेट दिल्यानंतर अक्षरश भारावला असल्याचे दिसून आले.यावेळी कृष्णा औसेकर, गोविंद औसेकर व संपूर्ण औसेकर कुटूंबाने आदरपूर्वक स्वागत केले.यावेळी श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी येथील बासुंदीचा आस्वाद घेतला असता हि खरी बासुंदीची पारंपरिक चव असे उद्गार काढले.
पारंपरिकरित्या म्हशीचे संगोपन करून गवळी समाजातील एक आदर्श कुटूंब म्हणून संत तनपुरे महाराज मठाजवळील औसेकर परिवाराची ओळख आहे.या परिवाराच्या चौथ्या पिढीचे प्रतिधीनित्व करणारा अप्पा औसेकर हा युवक विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतानाच आपल्या पारंपरिक व्यवसायात अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबविताना दिसून येतो.तर छत्रपती शिवरायांच्या जयंतीदिनी पंढरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास गवळी समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक सुरु करण्याची संकल्पना राबविण्यात त्याच्या पुढाकाराने सुरुवात करण्यात आली.
श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी आज या कुटूंबाची अतिशय आपुलकीने विचारपूस केल्यानंतर व औसेकर यांच्या म्हशींच्या गोठ्याची पाहणी करून जपलेल्या विश्वासार्हतेचे कौतूक केल्यानंतर औसेकर परिवार भारावून गेला असून आज श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी आमच्या दुग्धालयास भेट दिल्यामुळे आमची चार पिढ्याची पुण्याई फळास आली अशीच प्रतिक्रिया गवळी समाजातील एक सर्वमान्य युवा नेतुत्व म्हणून ओळखले जाणारे आप्पा औसेकर यांनी व्यक्त केली आहे.