कोल्हापूर: देवीचा जागर घालण्यासाठी लातूरहून आलेल्या कलाकारांना जेवणात गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका यात्री निवासमध्ये हा प्रकार घडला असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
लातूर जिल्ह्यातील रायतेवाडी या गावातील काही कलाकारांशी कोल्हापुरातील एका व्यक्तीने संपर्क साधून जागर करण्याचा कार्यक्रम निश्चित केला. त्यासाठी त्यांनी काही रक्कम ऑनलाइन अदा केली. ही रक्कम मिळाल्यानंतर नऊ कलाकार मंगळवारी कोल्हापुरात आले. ते गंजी गल्ली येथील एका खासगी यात्री निवासमध्ये उतरले. त्यांनी एका हॉटेलमधून जेवण मागवले. जेवल्यानंतर त्यांनी रात्री तेथेच मुक्काम केलाया जेवणात अज्ञाताने गुंगीचे औषध घातल्याने सर्व जण बेशुद्ध पडले. रात्री त्यांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम लुटून अज्ञाताने पोबारा केल्याचे सकाळी उघडकीस आले. बराच वेळ रूमचा दरवाजा न उघडल्याने यात्री निवासचे मालक त्यांना जागे करण्यासाठी गेले. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक गुजर अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, चोरी करत असताना संबंधिताने त्यांचे मोबाइल फोडून तेथेच टाकल्याचे निदर्शनास आले आहे. कुंताबाई कवरे, द्रौपदी सूर्यवंशी यांच्यासह नऊ कलाकारांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…