स्वेरीच्या एमबीए मधील ११ विद्यार्थ्यांची इनोवेटीव्ह कन्सल्टंन्सी अँड सर्व्हिसेस कंपनीत निवड
पंढरपूरः ‘इनोवेटीव्ह कन्सल्टंन्सी अँड सर्व्हिसेस’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी (श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट) संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय अंतर्गत असलेल्या एमबीए या पदव्युत्तर पदवी विभागातील ११ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
पुणे येथील ‘इनोवेटीव्ह कन्सल्टंन्सी अँड सर्व्हिसेस’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या एमबीए विभागातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून आरती धुळा कोळेकर, निकिता नरसिंह चोपडे, प्रतीक्षा महादेव खुर्द, प्रतिक्षा प्रकाश मेटकर, सोनाली सत्यवान गाजरे, गोपीनाथ ज्ञानेश्वर भंडारे, महेश भारत गायकवाड, अमाद अब्दुल अहमद, शिवदर्शन हरिश्चंद्र शिंदे, शिवराज बंडोपंत पाटील आणि सोमनाथ आप्पा इंगळे या अकरा विद्यार्थ्यांची निवड केली. स्वेरीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात ? याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षेचा निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते. या कारणामुळेच अभियांत्रिकीच्या पदवीच्या दोन्ही कॅप राउंड मध्ये स्वेरी सोलापूर जिल्ह्यात पहिल्या स्थानावर राहिले आहे. विद्यार्थी घडविण्यासाठी स्वेरीतील उच्च शिक्षित प्राध्यापक व प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ठ मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे प्लेसमेंट मध्ये देखील स्वेरीने आघाडी घेतली आहे. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे, प्रा. आशिष जाधव व एमबीएचे विभागप्रमुख प्रा. करण पाटील, प्रा. पी. एस. मोरे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.