पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या शहराध्यक्षपदी अमित डोंबे यांची निवड

सोलापूर जिल्ह्यात कॉग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात कॉग्रेसचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत असून अशातच सोलापूर जिल्ह्याच्या राजकरणात मोठा दबदबा असलेले धवलसिह मोहिते पाटील यांनी कॉग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे जिल्हा कॉग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाल्याचे दिसून येत असतानाच पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या अध्यक्षपदी अमित डोंबे यांची पुनच्छ निवड करण्यात आल्याने पंढरपूर शहरात युवक कॉग्रेसची आणखी दमदारपणे वाटचाल होईल अशी अपेक्षा कॉग्रेसप्रेमींकडून व्यक्त होताना दिसून येत आहे.     

  अमित डोंबे यांची पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येत असल्याचे पत्र प्रदान कऱण्यात आले असून या निवडीनंतर पंढरपूर शहरात युवक कॉग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी व कॉग्रेसचे विचार तळागाळात रुजविण्यासाठी नूतन शहर अध्यक्ष अमित डोंबे हे मोठे योगदान देतील असा विश्वास व्यक्त करताना पंढरपूर शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. राजेश भादुले यांनी या निवडीचे स्वागत केले असून कॉग्रेस पक्षात सत्ता असो अथवा नसो निष्ठेने कॉग्रेसचे काम करणाऱ्यांना संधी दिली जाते.कॉग्रेसच्या एका निष्ठावंत कार्यर्कत्याला न्याय मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले तर पंढरपूर शहरातील कॉग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांकडून व कॉग्रेसप्रेमी नागरिकांकडूनही या निवडीबाबत समाधान व्यक्त होताना दिसून येत आहे.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago