करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे होत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाईचे आदेश करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी दिले होते व यासाठी पोलीस ठाण्यातील हद्दीतील गावात पेट्रोलींग करत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री मुंडे,पो.ना स्वप्निल जयंत वाघमारे,चालक पो.कॉ. ताकभाते हे दिनांक ३१ जानेवारी रोजी सहा वाजनेच्या सुमारास पेट्रोलींग करत भोसे पाटी येथे आले असता बातमीदार मार्फत बातमी मिळाली की,भोसे गावात जाणारे रोडवरती इंडियन पेट्रोलपंपाचे जवळ इब्राहीम मटन व चिकन दुकानाचे शेजारी पत्रा शेडच्या आडोशाला एक इसम चोरून देशी,विंदेशी दारू विक्री करत आहे. त्या ठिकाणी गेले असता तेथे एक इसम दारु विक्री करित असलेला दिसून आला. पोलीस आल्याचे दिसताच तो इसम पळून जाण्यात यशस्वी झाला.सदर ठिकाणी खाकी रंगाचे बाँक्समध्ये खालील वर्णनाचा प्रोव्ही माल मिळुन आला तो खालीलप्रमाणे1) 2040 /-रु त्यामध्ये आँफीसर चाँइस कंपनिच्या 180 मिलीच्या 17सिलबंद बाटल्या प्रत्येकी किमत 120/-रु 2) 2850/- रु त्यामध्ये मँकडाँल नं 1कंपनिच्या 180मिलीच्या 19सिलबंद बाटल्या प्रत्येकी किं 150/-रु 3) 1060/-रु त्यात श्रीपुर डाँ ब्रँडी कंपनिच्या 180मिलीच्या 10सिलबंद बाटल्या प्रत्येकी किं 106/-रु 4) 3068/-रु त्यात देशी दारु टँगो पंच कंपनिच्या 180मिलीच्या 59सिलबंद बाटल्या प्रत्येकी कि 52रु 5) 4628/-रु त्यात देशी दारु संत्रा कंपनिच्या 180मिलीच्या 89सिलबंद बाटल्या प्रत्येकी कि 52रु असा एकूण 13646 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे तर पसार झालेल्या इसमा बाबत चौकशी केली असता त्याचे नाव प्रकाश विलास जमदाडे रा भोसे असे असल्याचे समजते असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तर याच दिवशी या पोलीस कर्मचाऱ्यांनी करकंब येथे केलेल्या कारवाईत 780 /-रु किंमतीच्या देशी दारु टँगो पंच कंपनीच्या 180 मिलीच्या 15बाटल्या प्रत्येकी किमत 52/जप्त करण्यात आल्या आहेत तर सदर प्रकरणातील आरोपी राजू धोत्रे यास पडकण्यात पोलिसांना यश आले आहे.
या दोन्ही कारवाया मुळे करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रित्या देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यांवर मोठा वचक बसला असून या कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.