ताज्याघडामोडी

अत्याचार पीडित दलित महिलांच्या मदतीला कधी चाकणकर आल्या नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या वाचाळपणा विरुद्ध रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी तर्फे आक्रमक होत रुपाली चाकणकर यांच्या फोटोला काळे फासून आझाद मैदान येथे जोरदार निषेध आंदोलन केले. शेतकरी आंदोलनाला प्रसिद्धी स्टंट असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले नसताना त्यांच्या विरुद्ध अपप्रचार करणाऱ्या रुपाली चाकणकर यांचा रिपाइं महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा ऍड. आशा लांडगे, मुंबई अध्यक्षा ऍड.अभया सोनवणे, उषाताई रामळू, नैना वैराट, जयश्री कांबळे, मुंबईचे युवा आघाडी अध्यक्ष रमेश गायकवाड, सोनान कांबळे आदीच्या नेतृत्वात रुपाली चाकणकर यांच्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारे अवमान केला नाही तर नेहमी शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, भूमीहिंनांसाठी भूमिका घेतली आहे. गरिबांच्या मदतीला धावून जाणारे, दलितांवर अन्याय होईल तिथे न्याय मिळवुन देण्यासाठी पोहोचणारे संघर्षशील नेतृत्व असे रामदास आठवले हे संघर्षनायक आहेत झाल्यावर रुपाली चाकणकर लाली लिपस्टीक लावलेले तोंड घेऊन कुठे लपवून बसलेली असते असा संतप्त सवाल रिपाइं महिला आघाडी ने विचारला आहे.

अत्याचार पीडित दलित महिलांच्या मदतीला कधी आल्या का या चाकणकर बाई ?’ असा सवाल रिपाइंच्या मुंबई अध्यक्षा ऍड.अभया सोनवणे यांनी केला आहे. दरम्यान, ‘पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या निवासस्थानी रिपाइं महिला आघाडीच्या नेतृत्वात शेकडो महिला कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. गल्लीत कार्यकर्त्यांनी दिल्लीतील नेत्यांवर खोटे आरोप करून टीका करून नये. टीका करण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी त्या अधिकारा सोबत जबाबदारी ही असते. ज्यांच्यावर टीका करायची त्यांच्या विधानाची सत्यता तपासून टीका करावी,’ असे मत रिपाइं च्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा संगीता आठवले यांनी व्यक्त केले

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago