पुणे : कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेकांना भरमसाठ वीजबिले आली आहे. काहींना अद्याप विद्युत बिले भरलेली नाही. भरमसाठ आलेली वीजबिले रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कमी करण्याची मागणी होत आहे. असे असताना आता राज्य सरकारने वीज थकबाकीदारांना मोठा शॉक दिला. ग्राहकांकडे 60 हजार कोटी रूपये थकबाकी साचल्यामुळे सरकारने आता वीज कनेक्शन कापण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.
71.68 लाख ग्राहकांना वीज कनेक्शन कापण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. सरकारची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं कारण देण्यात आले आहे. ग्राहकांकडे 60 हजार कोटी रूपये थकीत असल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. 15 दिवसांत थकबाकी न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक नोटीसा पुणे विभागातील ग्राहकांना बजवाण्यात आल्या आहेत.
राज्यात 71 लाख 68 हजार 596 वीजग्राहकांना अशा नोटीस आल्या आहेत. नोटीसची मुदत 30 जानेवारीला संपेल. त्यानंतर सोमवारपासून वीज कनेक्शन कापण्याचा धडाका सुरू होण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबरपासून नोटीसा पाठवायला सुरूवात झाली आहे. यात थकबाकी भरण्याचे आवाहन करून 15 दिवसांत थकबाकी न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक नोटीस पुणे विभागातील ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळातील वीजबिलात सवलत देण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…