अन्न विभागचे आयुक्त अभिमन्यु काळे(मुंबई) व सहआयुक्त(पुणे) शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत व सर्व अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले,श्रीमती नसरिन मुजावर,योगेश देशमुख,मंगेश लवटे व प्रशांत कुचेकर यांच्या पथकाने जानेवारी २०२१ महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु या अन्न पदार्थाचा सुमारे 6 कोटी रुपयाचा साठा जप्त केला आहे.
जिल्हा अन्न विभागाने केलेल्या कारवाईत दिनांक 02/01/2021 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी, श्री. यो. रो. देशमुख यांनी मोहोळ येथे श्री. श्रीकांत तानाजी वाघ, रा. मु. पो. देवडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर यांच्याकडून प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण 16230/- चा साठा जप्त केलेला आहे.
दिनांक 07/01/2021 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी, श्री. बी. बी. भोसले यांनी अकलुज, ता. माळशिरस येथील श्री. रावसाहेब महादेव वायदंडे, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांच्या बोलेरो पिकअप वाहन क्र. एमएच-45, टी- 1327 या वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचे वाहतुक करीत असल्याचे आढळून आल्यामुळे सदर वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण 911000/- चा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच बोलेरो पिकअप वाहन अंदाजे किंमत रुपये- 450000/- हे देखील जप्त करण्यात आलेले आहे.
दिनांक 07/01/2021 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी, श्री. मंगेश लवटे यांनी सांगोला येथील श्री. अर्जुन संजय साबळे, रा. हंगिरगे, ता. सांगोला, जि. सोलापूर यांचे दुचाकी वाहन क्र. एमएच-45, डब्ल्यु- 2135 या वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचे वाहतुक करीत असल्याचे आढळून आले. सदर वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण 7020/- चा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच दुचाकी वाहनाचे अंदाजे किंमत रुपये- 30000/- हे देखील जप्त करण्यात आलेले आहे.
दिनांक 10/01/2021 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी, श्री. बी. बी. भोसले यांनी अकलुज, ता. माळशिरस येथील श्री. मुनीर बाळु अत्तार व श्री. मुजबीन तांबोळी यांचे दुचाकी वाहन क्र. एमएच-42, एवाय- 7863 व दुचाकी वाहन क्र. एमएच-42, एबी- 2265 या वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचे वाहतुक करीत असल्याचे आढळून आले. सदर वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण 49080/- चा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच दोन्ही दुचाकी वाहनाचे अंदाजे किंमत रुपये- 75000/- हे देखील जप्त करण्यात आलेले आहे.
दिनांक 18/01/2021 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी, श्री. पी. एस. कुचेकर यांना प्राप्त गोपनिय माहितीवरुन पंढरपुर येथे श्री. सुरज शंकर गवळी व श्री.गणेश भोसले यांच्या बोलेरो पिकअप वाहन क्र. एमएच-45, एएफ- 4922 या वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचे वाहतुक करीत असल्याचे आढळून आले. सदर वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण 750000/- चा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थाचे वाहतुक केल्याप्रकरणी उपरोक्त वाहन जप्त करण्यात आलेले आहे.
दिनांक 24/01/2021 रोजी या कार्यालयास प्राप्त गोपनिय माहितीनुसार अन्न सुरक्षा अधिकारी, श्री. यो. रो. देशमुख यांनी अक्कलकोट येथे श्री. असिफ रमजान तांबोळी व श्री. मोहम्मंद इसाक तांबोळी यांच्या होंडाई वाहन क्र. एमएच-13, सीएस-2360 या वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचे वाहतुक करीत असल्याचे आढळून आल्याने सदर वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण 282060/- चा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थाचे वाहतुक केल्याप्रकरणी उपरोक्त वाहन जप्त करण्यात आलेले आहे.
दिनांक 27/01/2021 रोजी अन्न व औषध प्रशासनातील दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. अशोक इलागेर यांना प्राप्त गोपनिय माहितीनुसार या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. यो. रो. देशमुख यांच्या समवेत मंद्रुप येथे श्री. मोईद्दीन खान व श्री. समिरुल्ला खान यांच्या आयशर वाहन क्र. एमएच-12, एमव्ही-3863 या वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचे वाहतुक करीत असल्याचे आढळून आले. सदर वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण 3850000/- चा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थाचे वाहतुक केल्याप्रकरणी उपरोक्त वाहन जप्त करण्यात आलेले आहे.
दिनांक 28/01/2021 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी, श्रीमती न. त. मुजावर यांनी बार्शी येथे श्री. जाकिर चौधरी यांच्याकडून प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण 296060/- चा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
जानेवारी 2021 या एकाच महिन्यामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात 08 ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित अन्न पदार्थाचे एकूण एकत्रित किंमत रुपये 6,16,1,450/- चा साठा जप्त करण्यात आलेले आहे. तसेच प्रतिबंधित् अन्न पदार्थाचे वाहतुक केल्याप्रकरणी 08 वाहने जप्त करण्यात आलेले आहे. जप्त वाहनांची एकूण किंमत 2055000/- इतकी आहे. तसेच जप्त वाहनाचे परवाने रद्द करण्यासाठी आर.टी.ओ (परिवहन विभाग) कार्यालयास कळविण्यात आलेले आहे.
उपरोक्त सर्व प्रतिबंधित अन्न पदार्थाची कारवाई घेऊन संबंधित इसमांविरुध्द भा.दं.वि कलम 328 व अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांचे कलम 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत.
सोलापूरचे सहाय्यक आयुक्त प्रदिपकुमार राऊत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्यपूर्ण केलेल्या कारवायामुळे सोलापूर जिल्ह्यात गुटखा, पानमसाला,सुगंधित तंबाखु आदी प्रतिबंधित पदार्थांची विक्री व वाहतूक यास मोठा आळा बसला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…