ताज्याघडामोडी

धरणात उडी मारून युवकाची आत्महत्या!

कोरोना काळात काळात जगभरातील विविध कंपन्यांना फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. शिवाय जे नोकरीच्या शोधात होते, त्यांना नोकऱ्या मिळणं कठीण होऊन बसलं आहे. दिवसेंदिवस देशातील बेरोजगारी वाढू लागली आहे.

दरम्यान या बेरोजगारीमुळे नागपूरमधील एका तरुणाने त्याचं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे.बेरोजगारी आणि वाढत्या वयामुळे हा तरुण नैराश्यात गेला होता. शेवटी त्याने टोकाचा निर्णय घेतला.पुण्यातील खडकवासला धरणात उडी मारुन त्याने आत्महत्या केली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी खडकवासला धरणाच्या दरवाज्यातून या इसमाचा मृतदेह बाहेर काढला आहे.संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

1 month ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago